शेतकरी सरकारी कर्ज योजना... पंजाबराव देशमुख कृषी योजना...
👨🏻🌾 *सरकारी योजना: डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना काय आहे, कोण घेऊ शकतं लाभ?* 🧐 शेतकऱ्यांना सहकारी कृषी पतसंस्थांमार्फत दिलेल्या पीक कर्जावरील व्याज दरात वसुलीशी निगडीत प्रोत्साहनात्मक सूट देण्यासाठी शासनाने महत्त्वूपर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदीसाठी अल्प दराने कर्ज मिळावे व या कर्जाची परतफेड मुदतीत व्हावी यासाठी कर्जाच्या दरात सवलत देण्यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राज्य शासनाने अंमलात आणली आहे. 👉 त्यानुसार, या योजनेचा लाभ पिक कर्जाची उचल 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीतील हंगामामध्ये घेतलेले पिक कर्ज व ते विहित मुदीत फेडणारे शेतकरी सभासद व प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था (विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी) तसेच दि. 28 जून 2010 च्या शासन निर्णय प्रमाणे राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण व व खासगी बँका यांचे शेतकरी सभासद घेऊ शकतात. 📄 शासन निर्णय दि. 11 जून 2021 अन्वये सन 2021-2022 या वर्षापासून पीक कर्ज घेतलेल्या व विहित मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेण...